महिलेचा विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

0

बोदवड – तालुक्यातील बोरगाव वाकी येथील (30) वर्षीय महीलेच्या विनयभंग प्रकरणी दोघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, बोदवड तालुक्यातील बोरगाव येथील (30) वर्षीय गुन्ह्यातील फिर्यादी महिलेने आपल्या लहान मुलास का मारले?याची विचारणा यातील दोघां आरोपींना केली असता यातील आरोपी ज्ञानेश्वर शत्रुघ्न चव्हाण व सागर शत्रुघ्न चव्हाण दोन्ही रा.बोरगाव ता‌.बोदवड यांनी दि.11 रोजी रात्री 9:45 वाजेच्या सुमारास महिलेच्या राहते घरी जाऊन तिला अश्लिल शिविगाळ करत महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.यावेळी ओढाताण मध्ये फिर्यादी महिलाहीचे मंगलसुत्र तुटून नुकसान झाले असल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी बोदवड पोलिस स्टेशनमध्ये भाग 5, गु.र.नं.137/2019 भा.दं.वी.कलम 354,448,323,504,427,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.हे.काँ.वसंत निकम करीत आहेत.तर गुन्ह्यांतील दोन्ही आरोपी हे फरार असून गेल्या तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील मनुर खर्द येथील महिलेचा विनयभंग व बलात्काराची घटना नवीन असतांनाच आता बोरगाव येथील ही याचं आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.