भुसावळातील शिवाजीनगरला छत्रपती शिवाजी महाराज नगर नाव द्या ; पालिकेला निवेदन

0

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळातील शिवाजी नगर भागाला छत्रपती शिवाजी महाराज नगर असे पूर्ण नाव देण्यात यावे अशी मागणी येथील ऍड अभिजीत मेने व नागरिकांनी केली असून याबाबतचे निवेदन भुसावळ पालिकेला 13 रोजी निवेदन देण्यात आले आहे.

शिवाजी नगर हे नाव  एकेरी नावाप्रमाणे  ठेवण्यात आले आहे, यापुढे सर्वानी अशा एकेरी नावाचा  विरोध करावा व महाराजांचे नाव आदराने व संपूर्ण असे घ्यावे व लावावे अशी मागणी केली आहे निवेदनात नमूद आहे की  भुसावळ येथील शिवाजी नगर या भागाचे नावात दुरुस्ती करून  यापुढे छत्रपती शिवाजी महाराज नगर करण्यात यावे.

कारण-राजे चे एकेरी नाव घेणे हे योग्य नाही, आपल्या राज्यात अनेक नगर, उद्यान,चोक यांची नावे राजे च्या नावे  आहेत , काही ठिकाणी एकेरिच उल्लेख असतो .शिवाजी नगर हे नाव  एकेरी नावाप्रमाणे  ठेवण्यात आले आहे, यापुढे सर्वानी अशा एकेरी नावाचा  विरोध करावा व महाराजांचे नाव आदराने व संपूर्ण असे घ्यावे व लावावे अशी मागणी केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.