बोंडअळी नुकसान भरपाई मिळाली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार

0

जामनेर, दि. ३० –

जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी जामनेर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाहणी दौरा केला. गेल्या वर्षी कापसाचे बोंडअळीने मोठे आर्थिक नुकसान झाल्यानंतरही नुकसान भरपाई मिळाली नसल्याची तक्रार शेतकºयांनी केली.
कुंभारी तांडा येथील जि.प.च्या शाळेत शिक्षक नाही, रस्ता नाही, घरकुल मिळत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी त्यांचेकडे केली. कुंभारी तांडा येथील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. पाणी टंचाई असल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. मांडवे खुर्द येथील शेतकरी जुम्मा तडवी यांच्या शेतातील सुमारे ४० क्विंटल मका कोणीतरी जाळल्याने महाजन यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले. भारुडखेडे येथील ग्रामस्थांनी गावाजवळ पाझर तलावाची मागणी केली.
मंत्री महाजन यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार नामदेव टिळेकर जे.के.चव्हाण, सुरेश बोरसे, रमेश जाधव, दिपक तायडे, बीडीओ अजय जोशी, नररसेवक प्रा.शरद पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.