रिटायर आर्मीव्यापार्‍याला 4 लाखाचा चुना

0

अहमदनगर, दि. ३० –

आर्मीतून रिटायर झालेल्याने नगरमधील व्यापार्‍याला 4 लाख रुपयांना चुना लावला आहे. दामदुपटीचे अमिष दाखवून ही फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. हरिभाऊ बाबुराव डोळसे (रा.जुनाबाजार) असे फसवणूक झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. घटना 9 सप्टेंबर 2017 ते 22 जानेवारी 2018 या कळात ही फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोर्टाच्या आदेशानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेषकुमार चंद्रपाल सिंह (रा.भिंगार) असे आरोपींचे नाव आहे. सिंह हे पाथर्डी रस्त्यावरील सैनिकनगर येथे राहतात. आर्मीतून ते रिटायर झाले आहेत. गुतवणुकीचे वेगवेगळे मार्ग सांगून सिंहने डोळसे यांना प्रोत्साहित केले. 16 सप्टेंबर 2017 रोजी विशेषकुमार आणि डोळसे यांची भेट झाली होती. त्यावेळी ‘तुम्ही मला 4 ते 5 लाख रूपये द्या. मी तुम्हला ते दुप्पट करून देतो’ असे आमीष डोळसे यांना दाखविलं गेलं. दुपटीच्या मोहाला डोळसे बळी पडले. डोळसे यांनी स्वस्तिक चौकातील अ‍ॅक्सीस बँकेतून 4 लाख रूपये काडून डिसेंबर 2017 मध्ये विशेषकुमारला दिले. पुढं त्यांना काहीच मिळालं नाही. त्यांनी सिंहकडे तगादा लावला, पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डोळसे यांनी कोर्टात या फसवणूकीची तक्रार दिली. त्यानुसार कोर्टाच्या आदेशानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.भांबरकर करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.