बेवारस वाहनांचा लिलाव

0

भुसावळ :- येथील बजार पेठ पोलिसात जमा करण्यात आलेल्या चोरी व बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात येत आहे. तरी संबंधितांनी दि. ३ जून रोजी सकाळी १० वाजेपर्यंत संबंधित वाहनांवरी मालकी हक्काबाबातचे कागदपत्रांसह बाजारपेठ पोलिसांशी संपर्क साधावा अन्यथा सदर वाहनांच्या लिलावाची मंजुरी प्राप्त झाली असल्यामुळे त्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

लिलावातील वाहनांमध्ये हिरोहोंडा कंपनीची लाल रंगाची करिझ्मा गाडी तिच्या मागील नंबर प्लेटवर शिवाजी महाराजांचे चित्र आहे. स्लेंडर काळ्या रंगाची, डिस्कव्हर काळ्या रंगाची, पल्सर काळ्या रंगाची, पल्सर काळ्या रंगाची मागे मॉम गिफ्ट लिहिलेली. एलएमएल कंपनीची फ्रीडम सिल्वर रंगाची, बजाज कंपनीची लाल रंगाची सीटी १०० या गाड्यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी एएसआय एजाज पठाण (९४२३४८९७२६) व ०२५८२-२२२३९९ वर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.