बुलडाणा जिल्ह्यात आजपासून १० दिवस कडक लॉकडाऊन; जाणून काय आहेत नियम

0

बुलढाणा : राज्यात कठरो निर्बंध असूनही काही जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अमरावती, अकोला या जिल्ह्यांबरोबरच बुलडाणा जिल्ह्यातही आजपासून १० मे ते २० मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काल झालेल्या बैठकीत करोनाचा संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने कडक लॉकडाऊनचे निर्बंध लावण्यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊनची मागणी मान्य केली. त्यानुसार १० मे ते २० मेपर्यंत असा दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन बुलडाणा जिल्ह्यात लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये केवळ मेडिकल दुकानांची सेवा वगळता ईतर आस्थापने पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्याअंतर्गत एसटी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय ईतर धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसंच कडक लॉकडाऊन पाळण्याच्या दृष्टीने विशेष आदेश पोलिस विभागालाही देण्यात आले आहे.

आज रात्री ८ वाजेपासून कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठीचा सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंतचा वेळ आता रद्द करण्यात आला असून यात फक्त भाजीपाला आणि किराणासाठी होम डिलिव्हरीचा पर्याय दिला आहे. हॉस्पिटल आणि मेडीकल वगळता आता सर्वच काही बंद राहणार आहे. रस्त्यावर विनाकारण फिरण्यावर पूर्वीही बंदी होती आणि त्याची आता कडक अंमलबजावणी केली जाईल, अशी प्रतिक्रिया बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.