कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर चार लाखांच्या खाली, 24 तासातील कोरोनाबळीतही घट

0

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत काहीशी घट  पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 3 लाख 66 हजार 161 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 754 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात बरे झालेल्या कोरोनाग्रस्तांचा आकडाही साडेतीन लाखांपेक्षा जास्त आहे.

24 तासातील आकडेवारी

गेले काही दिवस 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. मात्र गेल्या 24 तासात भारतात 3 लाख 66 हजार 161 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 754 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 53 हजार 818 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

आतापर्यंत देशात 1 कोटी 86 लाख 71 हजार 222 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 26 लाख 62 हजार 575 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 46 हजार 116 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 37 लाख 45 हजार 237 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.