जळगावातील व्यापाऱ्यांची ७ लाखात फसवणूक ; तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

0

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील विविध ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडून माल घेऊन त्यांना न वटणारे धनादेश देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा तालुका पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला. तालुका पोलिसांनी या प्रकरणी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास प्रदीप मिरचंद माखीजा (रा. जळगाव), राहूल हिरालाल वाधवानी, हरिषकुमार उर्फ राहूल शोभराजमल पेशवानी (दोघे रा. इंदूर) यांना अटक केली आहे.

या तिघा संशयितांनी खोटेनगर, इच्छादेवी अशा तीन ठिकाणच्या व्यापार्‍यांकडून भांडे, स्टाईल्स, प्लायवूड असा माल खरेदी करुन तिघांची एकूण ९ लाख ४० हजार ८८० लाखो रुपयांची फसवणूक केली होती.

जळगाव शहरातील खोटेनगर येथील अंबिका बिल्डर्स यांच्याकडून प्रदीप मखीजा, राहूल वाधवानी व हरिषकुमार पेशवानी या तिघांनी ६४२ टाईल्सचे बॉक्स खरेदी करुन त्यापोटी दुकानमालकाल ७ लाख ६ हजार २०० रुपयांचा जळगाव शहरातील युनीयन बँकेचा धनादेश दिला होता. प्रदीप मखीजा यांच्या नावाचा धनादेश बॅकेत वटविण्यासाठी दिला असता, बँकेत रक्कम नसल्याने तो वटला नाही.ोदावरी प्लायवूडचे परेश जगदीश तलरेजा (रा. सिंधी कॉलनी) यांच्याकडून ८९ हजार ६८० रुपये किंमतीचे प्लायवूड खरेदी केले. व त्याबदल्यात न वटणारा धनादेश देवून फसवणूक केली होती.

रविवारी जळगाव शहरातील जितेंद्र इलेक्ट्रीकल्स ऍण्ड मल्टी ट्रेडींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच मालक सुशील संपतलाल पिंचा यांच्याकडून संशयित १२० सिलिंग फॅन खरेदी करणार असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांना मिळाली. हेडकॉन्स्टेबल हरिलाल पाटील, वासुदेव मराठे, विश्‍वनाथ गायकवाड, महेंद्र सोनवणे, अभिषेक पाटील यांच्या पथकासह जितेंद्र इलेक्ट्रीकल्स या या दुकानावर सापळा रचला व रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित प्रदीप माखीजा राहूल वाधवानी, हरिषकुमार पेशवानी या ताब्यात घेतले. तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.