अमरावती शहरातील लसीकरणाचा वेग मंदावला

0

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती  येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील एकूण साडेसात लाख लोकसंख्येपैकी केवळ 1 लाख 13 हजार 863 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोणा लसी च्या कमतरतेमुळे शहरातील लसीकरणाचा वेग मंदावला आहे .

कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशात सर्वत्र लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे .अमरावती महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा गेल्या तीन महिन्यापासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात फ्रंटलाईन वाॅरीयर ,दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षावरील नागरिक, तिसऱ्या टप्प्यात 45 ते 60 वयोगटातील नागरिक व चौथ्या टप्प्यात 18 ते 45 वर्षांपर्यंतचे नागरिक यांच्या लसीकरण मोहिमेस सुरुवात करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यापर्यंत राबविण्यात आलेली लसीकरण मोहीम सुरळीत होती.

मात्र 18 ते 45 वयोगटावरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली तेव्हापासून देशात सर्वत्र कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे . त्यामुळे अमरावती शहरातील हि लसीकरणाचा वेग मंदावला गेला आहे .गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत अमरावती शहरातील साडे सात लाख लोकसंख्येपैकी एक लाख 13, 863 नागरिकांचे लसिकरण आतापर्यंत पूर्ण झाले आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.