‘बीएचआर घोटाळ्यात गिरीश महाजन लाभार्थी; पोलिसांकडे ढिगभर पुरावे?

0

जळगाव । राज्यातील बहुचर्चित बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. BHR Scam बीएचआर पतसंस्था घोटाळ्यात जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी आता थेट माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांचे नाव घेतले आहे. आपल्याकडे याबाबत ढिगभर पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला.

बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने जामनेर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर जामनेरात दाखल होताच पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर खुलासे केले आहेत.

गिरीश महाजन यांनी बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारात थेट लाभार्थी दिसू नये म्हणून कार्यकर्त्यांच्या नावावर मालमत्ता घेतल्या. त्यानंतर त्या स्वत:सह पत्नी साधना महाजन यांच्या नावे करून घेतल्या. याबाबत आपल्याकडे ढिगभर पुरावे असून ते पुणे आर्थिक गुन्हे शाखेला दिल्याची माहिती पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यासंदर्भात पुरावे हवे असल्यास काही गट नंबर घेऊन जनतेने ऑनलाइन उतारे तपासून पहावे, त्यात सत्य बाहेर येईल, असे आवाहनही ललवाणी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.