बीएचआर घोटाळा प्रकरणात लवकरच एका मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल होणार , एकनाथराव खडसे

0

मुक्ताईनगर । भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटी रूपयांच्या घोटाळ्यांवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. आहे. यानंतर त्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात अजून एक नवीन गौप्यस्फोट केला आहे.

बीएचआर घोटाळ्यात राज्यातील काही बड्या नेत्यांची नावं आहेत. त्यांची यादीच तयार केली आहे. यात लवकरच एका मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे खडसे यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची ईडीने कारवाई करावी असंच हे प्रकरण असून येत्या दोन दिवसात या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

यावेळी खडसे यांनी भाजपचं थेट नाव घेतलं नाही, मात्र त्यांचा संपूर्ण रोख भाजप नेत्यांकडे होता. त्यामुळे या घोटाळ्यातील भाजपमधील हा बडा नेता कोण? अशी चर्चा रंगली आहे.

बीएचआर घोटाळा प्रकरण खूप मोठं आहे. हे पहिलंच प्रकरण मी बाहेर काढलं आहे. ईडीने कारवाई करावी एवढं मोठं हे प्रकरण असून दोन दिवसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असं सांगतानाच या घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याचं किंवा कार्यकर्त्याचं नाव नाही. शिवाय भाजप सोडून माझ्या सोबत आलेल्यांचंही नाव नाही. यात काही मोठ्या नेत्यांची नावं आहेत. त्यांची यादीच तयार केली आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. कालपर्यंत लोक म्हणत होते एकनाथ खडसे संपले. आता मी एकच प्रकरण बाहेर काढल्याने महाराष्ट्र हादरलाय. हे पहिलंच प्रकरण आहे. अजून कितीतरी प्रकरणं आहेत. पहिल्या प्रकरणात मोठी गँग अडकली आहे, असा दावाही त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.