पाळधी येथील ग्रामस्थ व हिंदुत्ववादी संघटनांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0

पाळधी  : ग्रामपंचायत येथील टिपू सुलतान प्रतिमा जबरदस्तीने लावण्याबाबत व गावात चालू असलेला अवैध कत्तलखाना या विरोधात दिनांक 27 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना  भेटून दिले निवेदन

पाळधी खुर्द ग्रामपंचायत येथे टिपुसुलतान प्रतिमा कुठलीही परवानगी व ठराव नसताना जबरदस्तीने प्रतिमा लावण्यात आली विशेष म्हणजे पाळधी खुर्द येथे सध्या प्रशासक  असून ग्रामसेवक डी डी पाठक यांना विचारले असता फोटो लावण्यासाठी कुठलीही परवानगी मागितली नाही कुठला ठरावही नाही शासनाच्या तसा जीआर सुद्धा नाही,

माजी सरपंचा यांचे पुत्र यांच्या समक्ष फोटो लावण्यात आला त्यामुळे गावात तणाव  निर्माण झाले

टिपू सुलतान प्रतिमा लावण्यासाठी ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक पाठक यांच्यावर दबाव धमक्या देण्यात आल्या ग्रामपंचायत येथे वाद उपस्थित केला याची खबर पोलिसांना मिळताच तेथे पोलिस  कॉन्स्टेबल व उपनिरीक्षक गायकवाड पोहोचले त्यांनी वाद शांत करत समजावून सांगितल्यानंतर पुढील काही काळ अर्थ काढला आहे,

पाळधी येथील अवैध कत्तलखाना पूर्ण सुरू झाल्याबद्दल हार्दिक ग्रामस्थांनी याचा निषेध केला असून तसे निवेदनही दिले आहे 16 सप्टेंबर या दिवशी या अवैध कत्तलखान्यावर 20 ते 22 गाई गोरे ताब्यात घेण्यात आले यावेळी उपाध्यक्ष नीलाभ रोहन या कारवाई वेळी उपस्थित होते परंतु पुन्हा हाच कत्तलखाना सुरू करण्यात आला याच परिसरातून आठ गाई व एक बैल काही आरोपी ताब्यात घेण्यात आले या आरोपींची हिम्मत वाढली असून कुठली ठोस कारवाई होत नाही असा प्रश्न पाळधी ग्रामस्थांना आहे

पाळधी सारख्या छोट्या गावात अवैध कत्तल खाना कसा चालतो या कत्तलखान्यात तुन अनेक गाई कापल्या जातात मुंबई, मालेगाव व आसपासच्या परिसरात गो मांस पोहोचवले जाते या कत्तलखान्याला कुणाचा आश्रय आहे? या कत्तलखान्या मुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतात हिंदू संघटनांनी याच्या निषेध जिल्हाधिकारी यांना नोंदवला आहे सध्या तणावाचे पाळधी पोलीस सध्या या दोन्ही प्रकरणात मौन बाळगून आहे  वेळीच पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी ही पाळधी करांची मागणी आहे,

Leave A Reply

Your email address will not be published.