शगुफ्ता अजिमोद्दिन शेख यांना महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक पुरस्कार जाहीर

0

 भडगाव ( प्रतिनिधी ) : ॲंग्लो उर्दू हाई स्कूल भडगावची उपशिक्षिका शेख शगुफ्ता अजिमोद्दिन यांना महाराष्ट्र समता शिक्षण परिषद तर्फे त्यांच्या ८ वर्षा पासून‌ कार्यरत असलेले त्यांच्या‌‌ सेवेतील केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक समाजीक तसेच लाॅकडाऊन काळात केलेले ऑनलाइन शिक्षणाचे काम, विद्यार्थ्यांचे घरोघरी जाऊन पालकांची भेट, विद्यार्थ्यांना शिकवणे आणि मार्गदर्शन करणे तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहून चांगल्या पद्धतीने पार पाडले.

अशा विचार करून राज्य समता शिक्षक परिषद तर्फे २८/११/२०२० रोजी महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी “तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले शिक्षक पुरस्कार ” जाहीर करण्यात आला. ॲंग्लो उर्दू हाई स्कूल भडगाव चे मुख्याध्यापक शेख अजिमोद्दिन जैनोद्दीन,सौंस्थेचे पदाधिकारी, तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी शेख शगुफ्ता अजिमोद्दिन यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.