बाळासाहेबांनी केलेल्या कार्याची परंपरा जोपासून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – शिरिषदादा चौधरी

0

फैजपूर | प्रतिनिधी

सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या ग्रामीण व आदिवासी बांधवांसाठी बाळासाहेबांनी केलेल्या कार्याची परंपरा जोपासून ग्रामीण भागाच्या व आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस – पी.आर.पी. (कवाडे गट) स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे उमेदवार शिरीषदादा चौधरी यांचा रावेर तालुक्यात प्रचारदौरा काढण्यात आला त्याप्रसंगी त्यांनी बोलतांना सांगितले.
दि.12 रोजी रावेर तालुक्यातील सावखेडा बु, सावखेडा खु, रसलपुर, बक्षीपुर, रमजीपूर, खिरोदा प्र.रावेर, आभोडा, आभोडा तांडा, जुनोने, विश्राम जिन्सी, जिन्सी, मोरव्हाल, गुलाबवाडी या गावांना प्रचार दौरा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हा बँक संचालक राजीव पाटील, रमेश नागराज पाटील, जिल्हा परिषद सदस्य सौ.सुरेखा नरेंद्र पाटील, माजी जि.प.सदस्य कलंदर तडवी, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती डॉ.राजेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डी.सी.पाटील, हाजी हमीद भायखा, यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकरअप्पा सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, राष्ट्रवादी काँग्रेस रावेर तालुका अध्यक्ष नीलकंठ चौधरी, माजी मसाका संचालक इस्माईल तडवी, आदिवासी सेवक रमजान तडवी, संजू जमादार, कामिल तडवी, रावेर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती यशवंत धनके, रावेर पंचायत समिती सदस्य समिती योगेश पाटील, गुणवंत टोंगळे, विनायक पाटील, सुधाकर पाटील, जयराम पाटील, विलास कराड, योगेश भंगाळे, किशोर बोरोले, प्रकाश पाटील, प्रकाश तायडे, महेमुद शेख, रोझोदा माजी सरपंच दीपक धांडे, भरत कुंवर, काँग्रेस आदिवासी सेलचे दिलरुबाब तडवी, आदिवासी सेवक रमजान तडवी, संजू जमादार, शरद चौधरी, सुहास चौधरी, किशोर चौधरी उपस्थित होते. खिरोदा, रसलपुर, बक्षीपुर, रमजीपूर, रसलपुर, खिरोदा या गावांमध्ये शिरिषदादा चौधरी यांचा पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले व प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन एकच वादा शिरीषदादा या घोषणा देत प्रचारात सहभागी प्रमुख नागरिक व ग्रामस्थांनी शिरीषदादा चौधरी यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचा विश्वास दिला तर आभोडा तांडा, जुनोने, विश्राम जिन्सी, जिन्सी, मोरव्हाल, गुलाबवाडी या गावांना आदिवासी बांधवांसह ग्रामस्थांनी प्रचाराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी शिरीष चौधरी यांनी लोकांशी संवाद साधून जनसेवेची परंपरा कायम ठेवून ग्रामीण व आदिवासी भागाचा सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.