बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो : संजय राऊत

0

मुंबई – महाराष्ट्रात जर भाजप-शिवसेनेच्या युतीला बहुमत मिळाले तर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, तेव्हा कोणीच आक्षेप घेतला नव्हता, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते. या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. अमित शहा यांनी बंद खोलीमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील उघड करण्यास नकार दिला आहे. मात्र मातोश्रीवरील ज्या खोलीमध्ये शहा आणि उद्धव यांच्यामध्ये चर्चा झाली ती बाळासाहेबांची खोली होती. ते आमचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे त्या ठिकाणी झालेल्या चर्चेला खोटं ठरवणं हे योग्य नाही. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे ठरलं होतं..’ असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

बाळासाहेबांच्या खोलीमध्ये बंद दाराआड उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये चर्चा झाली. हे मोदींपर्यंत पोहचवले गेले नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला. बंद दाराआड झालेली चर्चा काय होती हे अमित शाह यांनी उघड करावे. कारण ही चर्चा ज्या ठिकाणी झाली ती जागा साधीसुधी नाही. मातोश्रीवरील ज्या खोलीमध्ये शाह आणि उद्धव यांच्यामध्ये चर्चा झाली बाळासाहेबांची खोली होती. याच खोलीमध्ये बसून बाळासाहेबांनी अटलजी, आडवाणींपासून मोदींपर्यंत अनेकांना आशीर्वाद दिले आहेत. ही खोली आमच्यासाठी मंदिर आहे. येथे झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा आहे. या खोलीतच मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, हे मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, असे संजय राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले, आम्ही व्यापारी नाही, राजकारण हा आमचा धंदा नाही. भीती आणि धमक्यांना आम्ही भीत नाही, जे आम्हाला भिती दाखवतील त्यांना आम्ही धडा शिकवू.

Leave A Reply

Your email address will not be published.