‘बालाजी महाराज की जय’च्या निनादात रथोत्सवाला प्रारंभ

0

चोपडा (प्रतिनिधी) : येथील सुमारे साडे चारशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेल्या श्री व्यंकटेश बालाजी संस्थान च्या वहनोत्सवाची आज अश्वीन शुध्द एक्‌ादशीला श्री बालाजी महाराजांचा रथ दुपारी 1.00 वाजता यथोचित पूजा-अर्चा करुन दुपारी 1.15 वाजता काढण्यात आला.रथोत्सवात जमलेल्या भाविक जनसमुदायाने म बालाजी महाराज की जयफ च्या उद्घोषात रथ ओढण्यास प्रारंभ केला.रथ ओढण्यासाठी रथाचे पूजेचे मानकरी पाटील गढी मधील रहिवासी संग्राम जितेंद्र देशमुख,विक्रम राजेंद्र देशमुख यांनी सपत्नीक पूजन केले.

त्यानंतर मानकरी म्हणून नगराध्यक्षा मनीषा चौधरी,गटनेते जीवन चौधरी,माजी आमदार जगदीश वळवी,माजी शिक्षक आमदार दिलीपराव सोनवणे,पीपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,नगरसेवक भूपेंद्र गुजराथी,शेतकी संघ चेअरमन चंद्रशेखर पाटील,नायब तहसीलदार जितेंद्र पंजे,जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष गोरखतात्या पाटील,मुख्याधिकारी अविनाश गांगोडे,प्रविण गुजराथी, उप.पो.नि. रामेश्वर तुरणर,मंडळाधिकारी अमृतराव वाघ,बांधकाम अभियंता सचिन गवांदे,जगदीश लाड यांना श्री व्यंकटेश बालाजी संस्थान चे अध्यक्ष  व्ही. सी. गुजराथी यांच्या हस्ते मानाचे नारळ देण्यात आले. त्यानंतर या सर्वांनी दोर ओढून रथ मिरवणूक यात्रा दुपारी 1.20 वाजता सुरू केली. प्रारंभी रथा साठी परंपरागत पूजेचे मानकरी विक्रम राजेंद्र देशमुख, जितेंद्र वाघ यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन पुरोहित सुनिल नाईक यांनी श्री बालाजींची चांदीची चल मूर्ती रथारुढ केली.त्यावेळी श्री बालाजींचा प्रचंड जयघोष सुरु होता.ढोल ताश्यांच्या निनादात रथाने मार्गक्रमण केले.रथ बालाजी संस्थान पासून,आशा टॉकीज,रत्नावती नदी समांतर रोड,पाटील दरवाजा मार्गे सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत गजबजलेल्या शिवाजी चौकात आणला जातो.आणि ह्याच जागेवर रथ रात्रभर थांबविला जातो.नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता रथ पुन्हा ओढून मेन रोड मार्गे रथ घरापर्यंत नेला जातो.असा येथील रथोत्सव दोन दिवस चालतो.तालुक्यातील भाविक रात्री यात्रा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करतात.

यावेळी प्रा.आशिष गुजराथी,हरिष गुजराथी, मनिष गुजराथी, गिरिष गुजराथी,संजय सोमाणी,प्रवीण गुजराथी,किरण गुजराथी,मुरली गुजराथी आदी उपस्थित होते.यावेळी रथ मार्गात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी वीज वितरण विभागाचे कर्मचारी रथा पुढे अडणाऱ्या विजेच्या तारा दूर करीत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.