धावत्या रेल्वेतून पडून जळगावच्या पोलिसाचा मृत्यू

0

जळगाव :  राष्ट्रपतींच्या नाशिक दाैऱ्याच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या जळगावच्या पोलिसाचा गोदान एक्स्प्रेसमधून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजता लासलगाव रेल्वे स्थानकात घडली. राम उमाळे (वय २८, रा. खोटेनगर,) असे मृत पोलिसाचे नाव आहे.

महेंद्र सीताउमाळे हे जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हे शोध पथकात हाेते राष्ट्रपतींच्या नाशिक दाैऱ्याच्या बंदोबस्तासाठी नाशिक येथे रवाना झाले होते. नाशिक मुख्यालयात हजर झाल्यानंतर त्यांना चांदवड येथे ड्युटी लावण्यात आली. ड्युटीवर हजर होण्यासाठी बुधवारी सकाळी ते नाशिक येथे रेल्वेने निघाले होते. रेल्वेतून लासलगाव येथे उतरुन नंतर बसने चांदवड येथे जाणार होते. तत्पूर्वी लासलगाव रेल्वेस्थानकात गोदान एक्स्प्रेसमधून बुधवारी दुपारी एक वाजून १० मिनिटांनी पडून ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना रेल्वे राखीव दलाचे पोलिस उपनिरीक्षक महेश महाले व नितीन टुपके यांनी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घाेषित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.