वरणगावात घरफोडी ; दोन लाखाचा ऐवज लंपास

0

वरणगाव : शहरातील भोईवाडा येथे भर वस्तीतील घरातून अज्ञात चोरानी रोख रक्कम सह सुमारे दोन लाखाचा ऐवज लाबविल्याची घटना दि ९ रोजी सकाळी उघडकीस आली.

शहरातील तपत कठोरा रोडवरील भोईवाड्या शेजारील जकदर वाडयातील गुराचे व्यापारी शे समीर शे जमीर यांच्या घरात आज्ञात चोरानी मंगळवार च्या रात्री घरातील सर्व सदस्य झोपल्याच पाहुन घरात प्रवेश करून गोदरेज कपाटातील सत्तर हजार रुपये रोख व सोन्याच्या बागडया असा एकुन दोन लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी लाबवील्याचे बुधवारचा सकाळी घर मालक व सदस्य जागी झाल्यावर लक्षात आले

या बाबत वरणगाव पोलीसात शे समीरच्या खबरीनुसार चोरीच्या घटनेची भा द वी कलम ३८० प्रमाणे अज्ञात चोरटया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचा तपास पो हे का सुनिल वाणी हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.