बालकाच्या क्रूर हत्येप्रकरणी पोलिसांची तपासचक्रे वेगात

0

भडगाव,दि. 25-
भडगाव नऊ वर्षीय बालक इसम बाबू सय्यद या विदयार्थ्याचा अमानवी कृत्य करून निर्घृणपणे खून केल्याची घटना उघडकीस आल्या नंतर आरोपी मिळून नाही तरी, भडगाव पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत. दि. 25 रोजी दुपारी
जिल्हा पोलीस अधीक्षक ङॉ. पंजाबराव उगले यांनी कासोदा येथून पाचोरा जातांना अचानक भडगाव येथे भेट घटनास्थळी जाऊन गुन्ह्यातील माहिती जाणून घेतली . व तपासाबाबत मार्गदर्शन केले .
या गुन्ह्यात पोलिसांनी तपासकामी शहरातील अनेक नागरिकांशी संपर्क साधून संशयितांची कसून चौकशी केली आहे. शिवाय इतर गोष्टींमध्ये तथ्य आढळल्यास काहींची चौकशी अजून होणार असल्याची माहिती भडगाव पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी दिली .
मयत इसम बाबू याच्यावर जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले . त्याचा अहवाल नुसार या प्रकरणात मयत इसम सययद या बालकावर अनैसर्गिक कृत्य खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.