वरीष्ठ पातळीवर झाली युती आघाडी-ग्रामीण स्तरावर मनोमिलन होईना

0

आपापसातील कलह, मतभेदामुळे अवघड वाटणारे गणित विरोधकांना सोपे होणार

जळगांव. –
भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे राज्यात प्रमुख पक्ष असून वेगवेगळे निवडणूका लढविल्यास मतविभाजन होउन सत्ता स्थापन करता येणार नाही हे लक्षात आल्याने युती आघाडी वरिष्ठ पातळीवर झाली. परंतु तालुका ग्रामीण पातळीवर मात्र कार्यकर्त्यांचे मात्र एकमेकांन मदत न करण्याचे ठरल्याने आपापसातील मतभेद उफाळून आल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत आहे. यात मात्र अवघड वाटणारे मतविभागणी गणित विरोधकांना सोपे होणार आहे.
जिल्ह्यात रावेर व जळगांव लोकसभा मतदार संघ आहेत. यात गेल्या वेळी ऐनवेळी युती न करता स्वतंत्रपणे निवडणूका लढविण्याचे जाहिर झाले होते. त्यानंतर आघाडीतील पक्षांनी देखिल स्वतंत्रपणे निवडणूका लढविल्या. याचे परीणाम दिर्घ काळापर्यत झाले. विधानसभा, विधानपरीषद , जिल्हा परीषद, नगरपालिका आदी स्थानिक निवडणूकात देखिल याचा प्रभाव दिसून आला. या काळात आघाडी पेक्षा सेना भाजपाच्या पदाधिकार्‍यांमधेच तू-तू मै-मै पहावयास मिळाले आहे. रावेर लोकसभा मतदार संघात लेाकसभा निवडणूकीत भाजपा उमेदवाराचा प्रचार सहकार्य करणार नाही अशी आहे तर जळगांव लोकसभा मतदार संघात धरणगांव पाचोरा विधानसभा क्षेत्रात देखिल विरोंधाची धार तिव्रच आहे. ऐन दिवाळीत गुन्हे दाखल करून तुरूगांत टाकले त्यांना विजयाचे फटाके कसे फोडू देणार अशी विरोधाभास असणारी भुमिका वरीष्ठ पातळीवर युती झाली असली तरी ग्रामीण पातळीवर दिसून येत आहे. यामुळे गेल्या 20 -25 वर्षांपासून भाजपाचा असलेल्या दोन्ही मतदार संघात आघाडीच्या उमेदवाराचे विजयाचे अवघड वाटणारे गणित अंतर्गत कलहामुळे सोपे होणार आहे असेच चित्र आहे. दोनही मतदार संघातील कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करून हिन वागणूक दिल्याची भावना असल्याने मतदार संघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ कोणतेही सहकार्य करणार नाही, अशीच भुमिका सेनेच्या पदाधिकारी कार्यकत्यार्ंनी घेतली आहे.
जिल्हयात सत्ताधारी पक्षाच्या उणीदुणी हेवेदावे आरोपप्रत्यारोपांच्या फैरी पत्रकार परीषदा घेउन जाहिर होत असल्याने उणीपुरी साडेचार वर्ष सत्ता आलेली असतांना विरोधकांना हे आयते कोलित मिळणार आहे. याव्दारे मतविभागणी होउन सत्ताधारी भाजपाला चपराकच बसणार आहे. हेच सेनेला देखिल हवे आहे. अशी खरी गंमत पुढे बघायला मिळणार आहे.
दुसरीकडे विधानपरीषदेच्या आ. स्मिता वाघ यांना लोकसभेचे म्हणून जाहिर करण्यात आले त्यामुळे एका बाजुने जिल्ह्याचे नव्हेतर राज्याचे संकटमोचनरूपी हनुमान नाराज झालेत की काय? त्यांनी एका वृत्त वाहीनीला खाजगीत बोलतांना सांगीतले यावर्षी मोदी लाट वगैरे काही नाही, त्यावरून हि निवडणूक आ. वाघ यांना सहजासहजी भरभरून मतदान मिळेल याची शक्यता कमीच आहे. जळगांव शहर सोडले तर मतदारसंघात सात आहेत सातही तालुंक्यांचे स्थानिक राजे मदत करतीलच याची शक्यता नाही. एकीकडे नाराज स्वकीयांसह सेनेचा गट, दुसरीकडे दोघा भाउंचे गट, खुद्द त्यांच्याच तालुक्यासह पारोळा, एरंडोल हे तालुक्यात विरोधकांचा गट सक्रिय त्यामुळे आ. वाघ यांना कसोशीने ताकदीनीशी प्रयत्न करावे लागणार हेही तेवढे खरेच. विद्यमान खा. ए.टी. पाटील हे आणखी एक दोन कोणती भुमिका घेतात यावर देखिल अवलंबून आहे. त्यामुळे हि निवडणूक ना. महाजन म्हणतात त्यानुसार खरोखरच उमेदवाराचा कस लावणार हे निश्चित. जामनेर वगळता पारोळा,एरंडोल,धरणगांव, अमळनेर, पारोळा भडगांव चाळीसगांव हे सर्व तालुके आघाडीच्या उमेदवारांना सहज तारून नेतील असे चित्र आहे. सेनेचा नाराज गट मदत करेल किंवा नाही हे काळच ठरवेल.

Leave A Reply

Your email address will not be published.