बायोडीजलचा पर्दाफाश – लाखो रुपयांचे डीजल जप्त

0

जामनेर पोलीसांनी अड्डा उध्वस्त करत केली कारवाई


जामनेर् / प्रतिनिधी – जामनेर शहरातील घोडे पीर बाबानगर रोड घरकुल परीसरातील मशीदीच्या मालकीच्या व्यापारी गाळा नं २ मध्ये अवैध प्रकारच्या बनावट बायोडीजलच्या होत असलेल्या विक्रीची जामनेर पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहिती वरुन जामनेर पोलीस स्टेशनचे पो . नि . श्री .किरण शिंदे यांच्यासह तहसिलदार श्री . अरुण शेवाळे यांनी घटना स्थळ गाठले . त्या ठिकाणी १४ टाकी व २ प्लॅस्टीक गॅलन ( कॅन ) आढळुन आल्या .

सदर बायोडीजलचा नमुना तपासणी साठी पाठविण्यात आला आह . पुरवठा विभागाच्या वतीने तलाठी नितीन मनोरे यांनी जप्त केलेल्या मुद्देमालाचा रीतसर पंचनामा करून जमा केलेला साठा जामनेर पोलीसांनी ताब्यात घेऊन मुळ मालकाचा शोध घेतला जात आहे . या पर्दाफाश पथक धाडीमध्ये सहाय्यक पो . नि . किशोर पाटील, दिलीप वाघमोडे,रीयाज शेख , तुषार पाटील, होमगार्ड समुदेशक भगवान पाटील, पुरवठा विभागातील विठ्ठल काकडे , संतोष यांच्यासह आदींनी मोलाची कामगिरी बजावली .

Leave A Reply

Your email address will not be published.