बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या मंदिराची नासधूस, एका भक्ताची हत्या

0

बांगलादेश, ढाका

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंदू मंदिर, धार्मिक स्थळांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतरही धर्मांधांचे हल्ले सुरूच आहेत. हिंदू मंदिर, दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले केल्यानंतर धर्मांधांच्या झुंडीने नौखाली येथील एका इस्कॉन मंदिरावरही हल्ला केला. इस्कॉनचे सदस्य पार्थ दास यांची हत्या करण्यात आली. इस्कॉन मंदिराजवळील तलावात त्यांचा मृतदेह आढळला.

बांगलादेशातील दुर्गा पूजा मंडपावरील हल्ल्यानंतर शुक्रवारी अल्पसंख्याक हिंदू समुदाय आणि त्यांचे मुख्य धार्मिक स्थळ पुन्हा एकदा निशाण्यावर आले आहे. नोआखलीमध्ये जमावाने इस्कॉन मंदिरावर हल्ला केला आणि त्याची जोरदार तोडफोड केली आहे . तेथे उपस्थित असलेल्या भाविकांना मारहाणही केली आहे. अनेक यात्रेकरूंची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एका भक्ताची जमावाकडून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

नोआखली भागातील इस्कॉन मंदिराची कथितपणे तोडफोड करण्यात आली व जमावाने मंदिराच्या एका सदस्याची हत्या केली आहे . शुक्रवारी रात्री इस्कॉनने सांगितले की बांगलादेशातील नोआखली येथे जमावाने त्याच्या मंदिरावर आणि भाविकांवर हिंसक हल्ला केला आहे. 200 पेक्षा जास्त लोकांच्या जमावाने इस्कॉनचे सदस्य पार्थ दास यांची हत्या केल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. इस्कॉनने सांगितले की त्याचा मृतदेह मंदिराशेजारी असलेल्या एका तलावात सापडला आहे

इस्कॉनच्या एका ट्विटमध्ये या हल्ल्याची माहिती देणारी भयानक चित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. “आज बांगलादेशच्या नोआखली येथे इस्कॉन मंदिर आणि भाविकांवर जमावाने हिंसक हल्ला केला. मंदिराचे बरेच नुकसान झाले आहे आणि अनेक भाविकांची स्थिती गंभीर आहे. आम्ही बांगलादेश सरकारकडे हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्याची आणि दोषींना न्याय देण्याची मागणी करतो, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

इस्कॉनने ट्विट करून या घटनेची माहिती दिली. इस्कॉनने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदतीचे आवाहन केले आहे. या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इस्कॉनने केली आहे.

इस्कॉन मंदिराची तोडफोड होण्याआधी बांगलादेशात अनेक ठिकाणी दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले झाले आहे. ज्यात किमान 4 लोक मारले गेले आहेत. अनेक मंडपांमध्ये दुर्गा मूर्तींची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दुर्गा पूजेच्या वेळी कमिला शहरात हिंसा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. हा हिंसाचार करणाऱ्यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असे त्या म्हणाल्या.मुस्लिम बहुल बांगलादेशातील 169 दशलक्ष लोकसंख्येपैकी 10 टक्के लोक हिंदू आहेत.काही अज्ञात व्यक्तींनी बांगलादेशात दुर्गा पूजेच्या उत्सवाच्या वेळी काही हिंदू मंदिरांचे नुकसान केले आहे.

दरम्यान, नवरात्रोत्सवात कथित इशनिंदेच्या मुद्यावरून बांगलादेशात हिंदू मंदिरांवर काही समाजकटकांनी हल्ले केले. त्यानंतर उसळलेल्या दंगलींमध्ये तीन जण मारले गेले असून, २२ जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. हिंसाचारात ६० जण जखमी झाले आहेत. तर, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.