बहुप्रतिक्षित सलमान खानच्या ‘राधे’चं ‘सिटी मार’ गाणं प्रदर्शित ; सोशल मीडियावर धुमाकूळ

0

मुंबई : बॉलिवूडच्या दबंग खाननं अर्थात सलमान खानच्या बहुप्रतिक्षित ‘राधे : युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ (Radhe) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच ‘सिटी मार’ हे गाणं मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नुकतच ‘सिटी मार’ हे गाणं प्रदर्शित केलं आहे. या गाण्याला कमाल खान आणि लुलिया वंतूर यांनी गायलं असून शब्बीर अहमद यांनी हे गाणं लिहिलं आहे. हा ट्रॅक म्यूजिक रॉकस्टार आणि संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे त्यांनीच यापूर्वी सलमानसाठी सेंसेशनल हिट ‘ढिंका चिका’ हा ट्रॅक तयार केला होता.

सलमान खानची सिग्नेचर डान्स स्टाइल सोबतच हॉट आणि सुंदर अभिनेत्री दिशा पटानी प्रभुदेवाच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्यात प्रेक्षकांना आपल्या तालावर ठेका धरायला लावणारे सर्व गुण आहेत. जानी मास्टर आणि प्रभुदेवानं हिप-हॉपसोबतच क्लासिक साउथ स्टाईल कोरियोग्राफीचं उत्तम मिश्रण सादर केलं आहे. सोबतच, सलमान आणि दिशा दोघांनीही आपल्या सेंसेशनल केमिस्ट्री आणि उत्तम डान्स मूव्सनं सुंदर सादरीकरण केलं आहे. हे गाण बघताना तुम्हीही एका जागेवर बसू शकणार नाही हे नक्की.

‘सिटी मार’ची हुक स्टेप वेधतेय सर्वांचं लक्ष

‘सिटी मार’ची हुक स्टेप सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी पुरेशी ठरतेय आणि सलमान खानची ही हुक स्टेप प्रचंड व्हायरलदेखील होत आहे. ट्रेलर आणि गाणे पाहिल्यानंतर, या वर्षी ईदला प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे हे नक्की आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.