फवारणीमुळे विषबाधा झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील शेतकऱ्याचा आज दुपारी शेतात कपाशीवर फवारणी करतांना विषबाधा झाल्याने उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लक्ष्मण दामु सूर्यवंशी (वय ६३, रा. नांद्रा ता. पाचोरा) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नावे आहे. आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात कपाशीवर पडलेल्या विविध रोगराई वर अति उन्हात विषारी औषध फवारणी करत असतांना औषधीची विषबाधा होऊन आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली.

आज दुपारी कपाशी पिकावर ते औषध फवारणी करत होते. त्यावेळी उन्हात चक्कर येवून विषबाधा झाली. गावातील एक चांगले व सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व लक्ष्मण यांच्यावर काळाने घाला घातला. उपचारापुर्वीच त्याचे अकस्मात मृत्यू झाला. या घटनेमुळे नांद्रा परिसरात शेतकरीवर्ग, ग्रामस्थ यांच्यातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेबाबत पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत लक्ष्मण सुर्यवंशी यांच्या पश्चात दोन मुल, दोन मुली असा परिवार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.