फनी वादळामुळे भुसावळ विभागातून पुरीकडे जाणाऱ्या सात गाड्या रद्द

0

भुसावळ :  सर्वांत विध्वंसक मानलं जाणारं फनी वादळ ओदिशाच्या पूर्व किनारपट्टीवर येऊन धडकलंय. या वादळामुळे भुसावळ विभागातून पुरीकडे जाणाऱ्या सात गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. गाडी १२८४३/४४ पुरी-अहमदाबाद आणि १८४०७/८ पुरी साईनगर साईनगर/शिर्डी अप व डाऊन या दोन गाड्या अपडाऊनला ३ व ५ मे ला सुरुवातीच्या स्थानकावरून रद्द करण्यात आल्या आहेते.

गाडी क्रमांक १८४२१/२२ डाऊन व अप अजमेर-पुरी /पुरी-अजमेर ही गाडी २ व ७ मे ला सुरुवातीच्या स्थानकावरून रद्द करण्यात आली आहेत.२२९७४ पुरी गांधीधाम ही गाडी ४ मे रोजी सुरुवातीच्या स्थानकावरून रद्द करण्यात आली आहे. अप व डाऊनच्या सात गाड्या पुरी कडे जाणाºया व येणाºया ‘फोनी’ चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आलेली आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे. शिवाय भारतीय रेल्वेच्या शंभरपेक्षा जास्त गाड्या चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.