फडणवीस,महाजनांनी माझं तिकीट कापलं ; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

0

मुंबई : स्वतःच्या राजकारणासाठी विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मला तिकीट मिळू दिल नाही, त्यामुळेच माझं तिकीट कापण्यात आलं, असा गौप्यस्फोट असा गौप्यस्फोट माजी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केला आहे. खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे.

खडसे यांनी तिकीट कापण्यामागे फडणवीस आणि महाजन यांचा हात असल्याचं म्हटलं आहे. “भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीस यांनी आपल्याविषयी नाराजी व्यक्त केली. फडणवीस आणि महाजन यांनी मला तिकीट देण्यास पक्षश्रेष्ठींकडे विरोध केला. त्यावर आम्ही विचार करून निर्णय घेऊ असं पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होतं. पण, तिकीट कापण्यात आलं. कोअर कमिटीमधील आपल्या जवळच्या मित्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्याला माहिती दिली,” असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. आपल्याला तिकीट न दिल्यानं माझ्यासह अजून दहा बारा जागांचं नुकसान पक्षाला सोसावं लागलं. एखाद दुसऱ्या व्यक्तीच्या हट्टापाई पक्षाचं नुकसान झाल्याचं सांगत खडसे यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.