खडसे आमच्या संपर्कात ; गुलाबराव पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

0

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यासह भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच काल दुपारी जळगावात दाखल झाले. यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची बैठक बुधवारी अजिंठा विश्रामगृहावर झाली. यावेळी गुलाबराव पाटलांनी खडसेंसह अनेक नेते आमच्या संपर्कात असून किती नेते संपर्कात आहेत हे आता सांगू शकत नाही, असं म्हणाले.

जिल्हा परिषदेत आता भाजपचे बहुमत आहे; परंतु आम्ही प्रयत्न करणार आहाेत. राज्यातही भाजपकडे जास्त आमदार हाेते; परंतु सत्ता आमची आली. तसेच येथेही शक्य आहे. काही भाजपचे सदस्य आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत आघाडीचा सत्तेचा प्रयाेग नक्कीच हाेणार  असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.