प्राचार्य अपर्णा बुंदेले प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

0

जळगाव दि. 5-
पिंप्राळा येथील युटोपिया इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्य अपर्णा उमाकांत बुंदेले यांना जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत नुकताच प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अपर्णा बुंदेले या गेल्या 10 वर्षापासून युटोपिया स्कूल चालवित असून त्याद्वारे पिंप्राळा परिसरातील मध्यमवर्गीय तसेच कष्टकरी समाजातील मुलांना गुणवत्ताधारीत शिक्षण अल्पदरात उपलब्ध करुन दिलेले आहे. पालकांसाठी विविध कार्यशाळा, वृक्षारोपण तसेच जळगावातील आश्रमशाळांना मदत, दारिद्—यरेषेखालील मुलांना शाळा शुल्कात सवलत यासह विविध योजना त्या राबवित असतात. अशा योजनांद्वारे समाजाचा स्तर उंचावण्याचा त्यांचा हा एक छोटा प्रयत्न आहे, असे मत त्यांनी पुरस्कार वितरण वेळी बोलताना व्यक्त केले. पुरस्काराबाबत त्यांचे शाळेचे शिक्षकवृंद, कल्याणी बुंदेले, ज्योती पाटील, हर्षल पाटील, राहूल सुर्यवंशी आदींसह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.