जि.प.निधीतुन खेडगाव शिंदी पेंडगाव नालापुलाचे काम मार्गी

0

स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांत पहिल्यांदा थेट तालुक्याशी संपर्क

जळगांव. दि.5-
वर्षानुवर्षांची मागणी असलेल्या खेडगाव-शिंदी रस्त्यावरील नाल्यावर पुलाचे काम जि.प.सदस्या कल्पना पाटील यांच्या माध्यमातुन जिल्हा परीषदेमार्फत निधी उपलब्ध देण्यात आला आहे. भडगांव तालुक्यातील शेवटचे टोक असलेली शिंदी व पेंडगाव ही गावे स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी प्रथमच थेट तालुक्याशी जोडली जाणार आहेत.
या रस्त्यावरील नाला पुलाच्या बांधकाम फलकाचे अनावरण खेडगावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष विश्वास पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प.चे माजी सभापती विकास पाटील, पं.स. सभापती रामकृष्ण पाटील, डॉ.विलास पाटील, संजय पाटील, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, अतुल पाटील, शिंदी, खेडगाव, शिवणी, पिचर्डे व बात्सर येथील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य व विविध कार्यकारी सोसायटी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
वडजी कोळगांव गटातील जि.प.सदस्या कल्पना पाटील यांच्या माध्यमातुन जिल्हा परीषदेने या नाला पुलाच्या बांधकामासाठी 29 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिंदी हे लोकसंख्येच्या दृष्टीने भडगाव तालुक्यातील मोठे गाव आहे. तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील पेंडगाव येते. ही दोन्ही महसूली गावे कागदोपत्री भडगाव तालुक्यात असली तरी रस्त्याअभावी पारोळ्याशी संपर्कात जुळलेली आहेत. महसूल, पोलीस स्टेशन, कोर्ट-कचेरी आदी नित्याच्या कामांसाठी सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील खेडगाव खुर्द येथे पायी यावे लागते. आणि तेथुन भडगाव येथे जावे लागत होतेे. गेल्या 15 वर्षांर्पूर्वी शिंदी -खेडगाव रस्ता मुरूमीकरण खडीकरण करण्यात आले होते. परंतु या मार्गावरील नदीवर पूल नसल्याने या परीसरातील ग्रामस्थांची गैरसोय कायमच होत होती. मार्च अखेरीस पूल पूर्णत्वास आल्यानंतर शिंदी पेंडगाव व खेडगांव या गावांचा संपर्क दळणवळण गैरसोय यामार्गाने होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.