केरळ विधानसभेत छ.शिवाजी महाराजांचा जयघोष

0

जळगाव दि. 5:-
केरळ विधानसभेतर्फे राष्ट्रीय विद्यार्थी संसद 2019 चे आयोजन 23 ते 25 फेब्रु.दरम्यान तिरूवनंतपुरम येथे करण्यात आले होते.त्यात शहरातील युवाशक्तीचे विराज कावडिया, गिरीष पाटील, पियुष तिवारी, संदीप सुर्यवंशी, मनजीत जांगीड उमाकांत जाधव, आकाश धनगर, यांची निवड होऊन हे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. गिरीष पाटील याने,…वन नेशन वन इलेक्शन… या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण करून देशभरातून उपस्थित विद्यार्थी नेत्यांसह मान्यवरांची मने जिंकली.
यावेळी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांतर्फे… जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा… हे गीत सादर करताच… जय भवानी,जय शिवाजी… या जयघोषाने केरळ विधानसभा सभागृह दणाणून सोडले.केरळ विधानसभेच्या इतिहासात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष झाला…कास्ट अँण्ड ईटस् डीसकाऊंटेंट या विषयावर आधारीत सत्रात युवाशक्तीचे विराज कावडिया सहभागी झाले होते.
महाराष्ट्र संघाला संसदेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या मार्च ऑफ डेमाक्रॉसी या रॅलीचे पथसंचलन करण्याचा बहुमान केरळच्या सचिवालयाकडून देण्यात आला. या राष्ट्रीय कार्यक्रमास केरळचे राज्यपाल जस्टीस सदाशिवन,विधानसभाध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन, मुख्यमंत्री पुनराई विजयन, शशी थरून, आ. जिग्नेश मेवानी, डॉ.कन्हैया कुमार, स्वामी अग्नीवेश, युनिसेफचे प्रतिनिधी प्रकाश करात, आ. एम.ए.बेबी यांच्यासह केरळचे मंत्री, खासदार, आमदार,तसेच अनेक विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते. या संसदेत भारतभरातून विविध राज्यातील 3638 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. एकीकडे बोलले जाते की, भारतातील युवा दिशाहीन झाली आहे;परंतु देशहिताच्या चर्चेसाठी स्वत:चे पैसे खर्च करून देशभरातून विद्यार्थी एका ठिकाणी जमतात व देशाच्या सुवर्ण भविष्यासाठी चर्चा करून देशभरातून विद्यार्थी जमतात व देशाच्या सुवर्ण भविष्यासाठी चर्चा करतात हे सकारात्मक व प्रेरणादायक दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.