पोलिस बॉईज सेवन साईट फुटबॉल स्पर्धेत जळगाव पोलिस विजयी

0
जळगाव(प्रतिनीधी)- जळगाव पोलिस बॉईजच्या वतीने २१ ते २४ पर्यंत पोलिस बाईज सेवन साईट फुटबॉल स्पर्धेचे आयोजन पोलिस मैदानात करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेत धुळे, नंदुरबार, नाशिक आदी ठिकाणाहून २२ संघांनी सहभाग नोदवला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जळगाव पोलिस संघाने भुसावळ थॉमस डिसुजा क्‍लब संघाचा ०-१ ने पराभव करीत वियज मिळवला. विजेत्या संघाला दहा हजार रूपये रोख, स्मृतीचिन्ह व प्रत्येकी मेडल देण्यात आले. उपविजेत्या संघाला पाच हजार रूपये रोख व स्मृतीचिन्ह देण्यात आले. तर बेस्ट गोलकीपर आदित्य परब, बेस्ट डिफेंस तोसिफ खान, बेस्ट स्कोरर इसाक शेख, बेस्ट प्लेअर विकार शेख, यांना वयक्तीक बक्षिसे देण्यात आली. पंच म्हणून राहिल शेख, अमोल शिंपी, शेखर तडवी, चॉंद शेख यांनी पाहिले. यावेळी पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ, भास्कर पाटील, निखील ठक्‍कर, फिरोज शेख, निवेदिता ताठे, चेतन निंबोळकर, फारूख शेख, इकबाल मिर्झा, कलीम शेख आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जळगाव पोलिस बॉईज अध्यक्ष कुणाल मोरे, किरण तडवी, अमोल जाधव, धनंजय मोरे, जावेद शेख, जमिर शेख, सईद पिंजारी, अमित तडवी, परवेझ शेख, शेखर तडवी यांनी सहकार्य केले.
———-
विजयी संघातील खेळाडू
मनोज सुरवाडे (कर्णधार), सईद पिंजारी (गोलकिपर), योगेश साबळे (डिपेंडर), इका शेख, किरण तडवी, समिर तडवी, इस्तीयाज शेख, तौसिफ सैय्यद, तौसिफ खान, वसिम शेख, आदिल शेख, जमिर शेख, कादर शेख

Leave A Reply

Your email address will not be published.