पैशांच्या वादातून तरुणावर चाकूने वार; ४ जणांवर गुन्हा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील लक्ष्मीनगर भागात हनुमान मंदिरासमोर पैशांच्या वादातून तरूणावर चाकूने वार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील समतानगर भागातील रहिवासी आकाश भोला राठोड (वय २०) हा तरुण कामानिमित्ताने शनिवारी सायंकाळी सिंधी कॉलनी परिसरातील लक्ष्मीनगर भागात गेला होता. यादरम्यान संदीप कोळी याच्यासह इतर तीन जणांनी आकाश सोबत पैशांवरून वाद घातला. या वादातून संदीप कोळी याने आकाशला दगड मारला तर संदीपचा भाऊ याने धारदार शस्त्राने आकाशच्या मांडीवर वार करून दुखापत केली.

तसेच इतर दोन जणांनाही आकाशला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत आकाश जखमी असुन त्याच्या तक्रारीवरून संदीप कोळी यांच्यासह इतर तीन जण अशा एकूण चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रदीप पाटील हे करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.