जिल्ह्यात आज नव्याने ८० कोरोना बाधित

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव

जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. जळगाव शहरासह भुसावळ कोरोना हॉटस्‍पॉट होत आहे. यासोबतच चोपड्यात तालुक्यात देखील कोरोना रूग्ण संख्येत वाढ झाली असून मागील चोवीस तासात जिल्ह्यात ८० बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर एकाने कोरोनावर मात केलीय

भुसावळसह चोपड्यात सर्वाधिक रूग्ण

काल कोरोना बाधितांचा आकडा पावणे दोनशेच्‍यावर पोहचला होता. यात सर्वाधिक रुग्ण हे भुसावळ शहरात असून २५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर जळगाव शहरात कोरोना आकडेवारी वाढली आहे.

असे आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात एकुण ८० कोरोना रूग्ण आढळून आले आहे. यात जळगाव शहरात १३, जळगाव ग्रामीण ४, भुसावळ २५, अमळनेर २, चोपडा २५, यावल १, जामनेर १, रावेर ४, मुक्ताईनगर ४, आणि इतर जिल्ह्यातील १.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.