पेट्रोल डिझेल पुन्हा महागले : जाणून घ्या नवा दर

0

मुंबई :  दररोज काही पैसे दरवाढ करून ग्राहकांच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न पेट्रोलियम कंपन्यांनी सुरूच ठेवला आहे. दोन दिवस कोणतीही भाववाढ झाली नव्हती, परंतु बुधवारपासून पुन्हा एकदा पेट्रोलच्या किमती भडकल्या  आज पेट्रोल १५ पैसे तर डिझेल २३ पैशांनी वधारले.

आजच्या दरवाढीने मुंबईत पेट्रोलचा भाव ८९.१६ रुपये झाला आहे. डिझेलचा एक लीटरचा भाव ७९.२२ रुपये आहे. दिल्लीत एक लीटर पेट्रोलसाठी ८२.४९ रुपये असून डिझेलचा भाव ७२.६५ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल ८५.४४ रुपये असून डिझेल ७८.०६ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलचा भाव ८४.०२ रुपये असून डिझेल ७६.२२ रुपये आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ४५ डॉलर पुढे आहे. त्यामुळे तेल वितरक कंपन्यांचा आयतीचा खर्च वाढला आहे. परिणामी त्यांनी हा भार ग्राहकांवर टाकण्यास सुरवात केली आहे. मागील १० दिवसांत पेट्रोल १.४३ रुपयांनी महागले आहे.

13 दिवसांत मोठ्या प्रमाणात तेलाच्या किमतीत वाढ

20 नोव्हेंबरनंतर वाहनांच्या इंधनाच्या किमतीत 10 टक्के वाढ झाली आहे. दोन आठवड्यांच्या दिलाशानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. 13 दिवसांत पेट्रोल 1.46 रुपये प्रति लीटर महागले आहे. त्याचदरम्यान डिझेलचे दर 2.11 रुपये प्रतिलिटरने वाढले आहेत. 20 नोव्हेंबरपासून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तत्पूर्वी 22 सप्टेंबरपर्यंत पेट्रोलचे दर स्थिर होते. तर डिझेलच्या किमतीत 2 ऑक्टोबरपासन कोणताही बदल झालेला नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.