पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव

0

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या.  पेट्रोलच्या भावात 13 ते 15 पैशांची कपात केली आहे, तर डिझेलची किंमत 18 ते 20 पैशांनी खाली आली आहे.

राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 15 पैशांनी कमी होऊन 81.40 रुपये तर डिझेल 19 पैशांनी कमी होऊन 72.37 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबई पेट्रोलची किंमत 88.07 रुपये आणि डिझेलची किंमत 78.85 रुपये प्रतिलिटर आहे.  यापूर्वी 30 जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलच्या किमतीत 8.36 रुपयांची कपात केली होती, त्यामुळे दिल्लीत डिझेलची किंमत बाजारात प्रति लिटर 73.56 रुपये होती.

देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती काय आहेत ते जाणून घ्या.

दिल्ली पेट्रोल 81.40 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 72.37 रुपये आहे.

मुंबई पेट्रोलची किंमत 88.07 रुपये आणि डिझेलची किंमत 78.85 रुपये प्रतिलिटर आहे.

कोलकाता पेट्रोल 82.92 रुपये आणि डिझेल 75.87 रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नई पेट्रोलची किंमत 84.44 रुपये आणि डिझेलची किंमत 77.73 रुपये प्रतिलिटर आहे.

नोएडा पेट्रोल 81.84 रुपये तर डिझेल 72.68 रुपये प्रतिलिटर आहे.

गुरुग्राम पेट्रोल 79.57 रुपये तर डिझेल 72.84 रुपये प्रतिलिटर आहे.

लखनऊ पेट्रोल 81.74 रुपये तर डिझेल 72.58 रुपये प्रतिलिटर आहे.

पटना पेट्रोल 83.99 रुपये तर डिझेल 77.70 रुपये प्रतिलिटर आहे.

जयपूर पेट्रोल 88.57 रुपये तर डिझेल 81.32 रुपये प्रतिलिटर आहे.

 

जागतिक इंधन बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. जून 2020 नंतर प्रथमच क्रूड तेल 40 डॉलर प्रति बॅरलच्या खाली पोहोचले आहे. त्याचबरोबर यूएस क्रूडच्या किंमतीतही 8 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. काल, कच्च्या तेलाच्या बाजारात किंमतींमध्ये किंचित वाढ झाली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.