पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात, जाणून घ्या आजचे दर

0

मुंबई : आंतरराष्ट्रीय कमॉडिटी खनिज तेल स्वस्त झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी इंधन दरात कपात केली. पेट्रोल २२ ते २३ पैसे आणि डिझेल प्रती लीटर २० ते २१ पैशांची घट झाली. यामुळे मुंबईत पेट्रोल दर प्रति लीटर ७४.१६ रुपये आणि डिझेल दर ६६.४३ रुपये झाला आहे.

जगभरातील तेलाची मागणी घटल्याने मागील दोन महिन्यात तेलाच्या किमती १० ते १५ डॉलर्सने कमी झाल्या आहेत. तर मागील आठवडाभरात खनिज तेलाच्या किमतीत ११ टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे खनिज तेल उत्पादक देश धास्तावले आहेत. तेलाच्या किंमतीमधील घसरण रोखण्यासाठी त्यांच्याकडून उत्पादन कपात करण्यात आली आहे. मात्र तेलाच्या किंमतींमधील घसरण कायम आहे. दरम्यान गेले तीन दिवस देशांतर्गत

पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल दरात २२ ते २३ पैसे आणि डिझेल प्रती लीटर २० ते २१ पैशांची कपात केली. यामुळे पेट्रोलचा भाव ५ महिन्यांच्या नीचांकावर तर डिझेलचा भाव ७ महिन्यांच्या नीचांकावर आला आहे.  मुंबईत पेट्रोल दर प्रति लीटर ७४.१६ रुपये आणि डिझेल दर ६६.४३ रुपये झाला आहे. दिल्लीत पेट्रोल दर प्रति लीटर ७१.४९ रुपये आणि डिझेल दर ६४.६५ रुपये झाला आहे. चेन्नई पेट्रोल ७४.२८ प्रति लिटर तर डिझेल ६७.६५ प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ७४.१६ प्रति लीटर तर डिझेल दर ६६.४३ रुपये झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.