पेट्रोल आणि डीझेलच्या भावात पुन्हा वाढ : जाणून घ्या आजचे नवे दर

0

मुंबई : पश्चिम बंगालसह चार राज्यांच्या विधान सभा निवडणुकांमुळे कंपन्यांनी इंधन दर जैसे थेच ठेवले होते. मात्र त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा कायम ठेवला आहे. सोमवारी इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर आज मंगळवारी पुन्हा एकदा दोन्ही इंधनाच्या किमतीत वाढ केली आहे. आज मंगळवारी देशभरात पेट्रोल २३ पैसे आणि डिझेल २५ पैशांनी महागले आहे.

आजच्या भाव वाढीनंतर मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९९.७० रुपयांवर गेला आहे. मुंबईत पेट्रोल शंभरी गाठण्यापासून आता केवळ एक पाऊल दूर आहे. दिल्लीत पेट्रोल ९३.४४ रुपये आहे. चेन्नईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.०६ रुपये आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९३.४९ रुपये झाला आहे.

मुंबईत आजचा एक लीटर डिझेलचा भाव ९१.५७ रुपये आहे. दिल्लीत डिझेलचा भाव ८४.३२ रुपये आहे. चेन्नईत डिझेल ८९.११ रुपये प्रती लीटर आहे. कोलकात्यात डिझेल ८७.१६ रुपये प्रती लीटर झाले आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. लॉकडाउनची निर्बंध शिथिल होत असून वाहतूक पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे विकसित देशांमधील इंधन मागणी वाढली आहे. गेल्या दोन आठवड्यात कमॉडिटी बाजारात क्रूडच्या दरात तेजी दिसून आली आहे. सोमवारी बाजार बंद होताना क्रूडचा भाव २ टक्क्यांनी वधारला होता. अमेरिकी बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव १.५९ डॉलरने वधारून ६८.३४ डॉलर प्रती बॅरल झाला. तर यूएस टेक्सासमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १.९४ डॉलरने वधारून ६५.८९ डॉलर प्रती बॅरल झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.