एरंडोल परीसरात वादळासह झालेल्या पावसात बैल ठार व मोठ्या प्रमाणात वित्तहानी

0

 एरंडोल: येथे व परीसरात सोमवारी दुपारी २:३०ते ३वाजेदरम्यान वादळासह गारांचा पाऊस झाला.या अस्मानी संकटात येथील बापू फुला महाजन यांच्या खळ्यात बांधलेल्या बैलाच्या अंगावर झाड पडल्याने बैल दगावला.

म्हसावद,एरंडोल,धरणगाव राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी अंशत: झाडे पडली.मरीमाता मंदीर व म्हसावद नाक्याजवळ झाडांच्या फांद्या शहरातील मेन विद्युत वाहीनीवर पडल्यामुळे जवळपास ५तास विद्युत पुरवठा खंडित झाला.

पुन्हा सायंकाळी ४वाजेच्या सुमारास भयंकर वादळाचे आगमन झाले यावेळी अनेक घरांची पञे उडाली,बसस्थानक परीसरातील लोटगाड्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ पर्यंत घसरत आल्याने त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ठिकठिकाणी झाडे कोसळल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा २५मे रोजी बंद राहणार असल्याची माहीती नगरपालिका सूञांनी दिली.

या वादळामुळे एरंडोल परीसरात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.नुकसानीचे त्वरीत पंचनामे होऊन नुकसानग्रस्त नागरीक व शेतकर्यांना शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.