पेट्रोलवर १०, डिझेलवर १३ रुपये एक्साईज ड्युटी वाढवली : मोदी सरकारचा निर्णय

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर रोड सेससह एक्साईज ड्युटी अनुक्रमे १० आणि १३ रुपये प्रति लिटर वाढवली आहे. ६ मेपासून हा बदल लागू होईल.

दरम्यान, या उत्पादन शुल्कवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किमतीत कोणतेही बदल होणार नसल्याने सर्वसामान्य वाहनचालकांना या दरवाढीचा फटका बसणार नाही.

पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात केल्याने एक लाख 60 हजार कोटींचा वाढीव महसूल मिळण्याचा अंदाज आहे. कच्चे तेल स्वस्त झाल्याने तेलकंपन्या भार सोसणार असल्याची माहिती आहे. उत्पादन शुल्कवाढीचा किरकोळ विक्रीवर परिणाम होणार नाही

पेट्रोलवरील एकूण उत्पादन शुल्क आता लिटरमागे 32.98 रुपये, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क आता लिटरमागे 31.83 रुपये इतके झाले आहे. 2014 मध्ये मोदी सरकारने सत्ता हाती घेतली, तेव्हा पेट्रोलवरील कर 9.48 रुपये प्रतिलिटर होता, तर डिझेलवरील कर 3.56 रुपये होता, अशी माहिती ‘टाईम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.