बोदवड येथे पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी

0

बोदवड (प्रतिनिधी) : शहरातील जामठी रोड वरील दिवाणी व फौजदारी न्यायालया जवळ सामूहिक पाणीपुरवठा योजना (ओडीए)ची पाईपलाईन येथील रोडावरून अवजड वाहन गेल्याने त्यावर प्रचंड दाब पडून फुटल्याची घटना दि.६ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.पाईपलाईन फुटल्याने पाच ते साडेपाच लाख लिटर पाण्याची नासाडी झाली.

शहर तथा तालुका वासियांनी अनेक वर्षे पाण्यासाठी रानावनात मैलोन मैल भटकंती केल्याचा अनुभव आहे.त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ही होत असलेली पाण्याची नासाडी पाहून नागरिकांनी रोष व्यक्त केला.न्यायालय नजीकच भर रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले असल्याने त्यांमध्ये पाणी साचले जाते.त्यामुळे येथे अनेकदा किरकोळ अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत.तसेचं येथील या खड्ड्यांमध्ये अनेकदा साचत असलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन परिसरातील नागरिकांना आरोग्यचा गंभीर प्रश्न निर्माण होत असतो.

Leave A Reply

Your email address will not be published.