पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात आणखी एक ऑडिओ क्लिप आली बाहेर ; वाचा ऑडिओमधील संवाद

0

मुंबई : सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्येप्रकरणी राजकारण तापलं आहे. शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात पुढे आल्याने आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे. दरम्यान,  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातआणखी एक ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे.

 

यापूर्वी ज्या ऑडिओ क्लिप आल्या त्यातल्या सर्वच्या सर्व क्लिप आम्ही आपल्याला ऐकवल्या आहेत आणि त्याचं शब्दांकनही केलेलं आहे. आता पूजा चव्हाण आणि गबरुशेठ यांच्यातील एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. मात्र, गबरुशेठ कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गबरुशेठविषयी उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

ऑडिओ किल्पमधील संवाद

गबरुशेठ – हॅलो

पूजा चव्हाण – आपका हुकूम सर आँखों पर..रिजेक्ट लिस्टमधून नंबर काढलाय.

गबरुशेठ – हाहाहाहाहा…क्या बात है..थँक्यू थँक्यू..

पूजा चव्हाण – मी काढणार नव्हते महिनाभर तरी, मात्र तुमच्या शब्दापुढे जाता येत नाही.

गबरुशेठ – असं का…?

पूजा चव्हाण – विचारा किती दिवसांपासून…आठ दिवस झाले….अजून महिनाभर ठेवणार होते.

गबरुशेठ – वेटिंगवर टाका वेटिंग…मग बाकी…

पूजा चव्हाण – बाकी काय…हाय की आता तुमचं…काय करावं…इलाज नाही..

गबरुशेठ – कवा जायचं आपल्याला…

पूजा चव्हाण – मुंबईला, पुणे ?

गबरुशेठ – कुठंही जाऊ काय त्यात?

पूजा चव्हाण – बघा…आं…

गबरुशेठ – यस्स्स….

पूजा चव्हाण – कुलू मनालीला…आणि जम्मू काश्मीरला जाऊ…

गबरुशेठ – 100 टक्के जाऊ…

पूजा चव्हाण – बघा बघा रं…

गबरुशेठ – होय..

पूजा चव्हाण – लवकर वापस या..मग..

गबरुशेठ – ठीकय…

पूजा चव्हाण – लगेच निघा…काम झाल्या झाल्या…मग जाऊयात…

गबरुशेठ – बरं…

पूजा चव्हाण – पुणे, मुंबई बस झालं आता…

पूजा चव्हाण – त्यांना म्हणावं…आधीच काडीयत..वाळून जाता म्हणावं..

गबरुशेठ – मग…

पूजा चव्हाण – खरं हाय का नाही…

गबरुशेठ – खरंय…खरंय..

पूजा चव्हाण – वाळून जाताल म्हणावं…उंच आहात..नाहीतर काय?

गबरुशेठ – खाऊ पिऊ घालत नसाल…

पूजा चव्हाण – बघा ना…काय माहित…विचारा त्यांना..

गबरुशेठ – तुमच्यामुळंच झालं ना…

पूजा चव्हाण – माझ्यामुळं कशाला…मी थोडीच त्यांना खाऊ पिऊ घालते..

गबरुशेठ – असंय का?

पूजा चव्हाण – मी ज्यादिवशी डबा देते ना….त्यादिवशी त्यांचं पोट पुढे येतं…

गबरुशेठ – काय काय…

पूजा चव्हाण – मी ज्यादिवशी डबा देते ना….त्यादिवशी त्यांचं पोट दिसतंय… बाकी मजेत असतं सगळं..

गबरुशेठ – तुमचंबी पोटं पुढं आलंय..म्हणं ना…

पूजा चव्हाण – कोणाचं…माझं नाहीरं बाबा..स्लीम झालीय मी आता..

गबरुशेठ – हाहाहाहा

पूजा चव्हाण – स्लीम झाले मी आता…

गबरुशेठ – बरं..चालतंय…मग बाकी?

पूजा चव्हाण आणि गबरुशेठ यांच्यात डबा देण्यावरुन आणि पोट पुढं येण्यावरुन चर्चा होते.

पूजा चव्हाण- बाकी काय निवांत…गच्चीवर उभी ठाकलीय… बघा हवा यायलीय मस्त…

गबरुशेठ – जास्त वेळ बोलू शकत नाही…

पूजा – हा सोबत माणसं आहेत ना…

गबरुशेठ – हो..हो..

पूजा चव्हाण – कळलं कळलं…झोपते मग मी…

गबरुशेठ – सकाळी बोलतो…

पूजा चव्हाण – ऐकलं बरं तुमचं… आता झोपते मी..

गबरुशेठ – हो..हो…झोपा झोपा..

पूजा चव्हाण – आणि त्यांना सांगा फोन करु नका….झोपू द्या…

गबरुशेठ – बरं बरं..फोन नाही करणार..ठीक आहे..

पूजा चव्हाण – हम्म्म…बाय..गुड नाईट..स्वीट ड्रीम.. टेक केअर..

गबरुशेठ – बाय..गुड नाईट..स्वीट ड्रीम.. टेक केअर..ओके बाय…

Leave A Reply

Your email address will not be published.