अमरावती येथे बोगस कोरोना सर्टिफिकेट देणारे रॅकेट सक्रिय

0

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह जि प सदस्या ला लॅब कडून विचारणा

अमरावती (प्रतिनिधी) : कोरोना चा अहवाल पॉझिटिव्ह हवा की निगेटिव्ह असी थेट विचारणा एका लॅब कडून अमरावती जिल्हा परिषद आरोग्य समितीचे सदस्य प्रकाश साबळे यांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले . याबाबत चौकशी केली असता अहवाल देण्यामागे अमरावतीत मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा गौप्यस्फोट जि प सदस्य प्रकाश साबळे यांनी जीप सभागृहात केला आहे . यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील पॉझिटिव रुग्णांच्या कागदपत्राच्या चौकशीचे आदेश दिले आहेत .

अमरावती जिल्ह्यात सध्या सर्वत्र कोरोना ने थैमान घातले असून . कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहे . कोरोणाचे वाढते प्रमाण बघता  प्रशासनाने सर्व प्रकारच्या उपाययोजना करित आहेत . मात्र या कोरोणा कालावधीत काही विमा कंपनी बोगस कोरोना रुग्ण दाखवत सर्टिफिकेट देत असल्याचा धक्कादायक प्रकार जी.प. सदस्य प्रकाश साबळे यांनी सभागृहात उपस्थित केला आहे. कोरोना विमा योजना लाभ घेणारे बहुतांश सरकारी निमशासकीय कर्मचारी यात सहभागी आहेत . तसेच बोगस कोरोना पॉझिटिव्ह सर्टिफिकेट देऊन दोन लाखाच्या जवळपास असलेल्या कोरोना विमाचा फायदा कर्मचारी घेत  असल्याचा आरोप सदस्य प्रकाश साबळे यांनी सभागृहात उपस्थित केला.

ही गंभीर बाब असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश जि.प. अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिले. तर जी.प. अंतर्गत अशा कुठल्या बोगस सेंटर दवाखाने आहेत. त्याची शहानिशा करून. कार्यवाही करू असे जि.प. सिईओ अमोल एडगे यांनी यावेळी सांगितले. सोमवार 22 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हा परिषदेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा पार पडली. डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात सोशल डिस्टंसिंग मध्ये ऑनलाइन सभेत अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे,सभापती बाळासाहेब हिंगणकर ,  दयाराम काळे तर सदस्य नितीन गोडांने , प्रकाश साबळेृ, दत्ता  ढोमणे , रवींद्र मुंदे, सुहासिनी ढेपे  तसेच काही सदस्य ऑनलाईन सभेला उपस्थित होते ,कोरोना विमा रॅकेट जिल्ह्यात सक्रिय झाले असून.काहि प्रायव्हेट कोव्हीड हॉस्पिटल ,लॅब मध्ये बोगस कोरोना पॉझिटिव्ह सर्टिफिकेट दाखवून. विमा योजना चा लाभ घेत असल्याचा आरोप प्रकाश साबळे यांनी आज सभागृहात मांडला. एकीकडे जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे तर दुसरीकडे बोगस  कोरोना रुग्ण आढळून येत आहे हा अमरावती जिल्ह्याची प्रतिमा मलिन करण्याचा उद्देश आहे . राष्ट्रीयीकृत बँकेकडून विमा काढले आहेत.

 

यामध्ये आय सी आय सी आय बँक, आय एफ डी अशा बँक सहभागी आहेत ज्या कोरोना बिमा योजना राबवीत आहे. याचा गैरवापर काही कर्मचारी करीत असून जिल्ह्यातील काही खाजगी दवाखाने लॅबमधून बोगस कोरोना पॉझिटिव्ह सर्टिफिकेट देऊन या विमा योजनेचा लाभ घेत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. कर्मचारी बोगस पॉझिटिव्ह प्रमाणपत्र घेऊन पंधरा दिवस विश्रांती घेऊन या दोन लाखाचा विमा चा लाभ घेत असल्याचा धक्कादायक खुलासा जीपच्या सर्वसाधारण सभेत केला . यावर सभागृहात एक मताने ठराव पारित करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी सभागृहात करण्यात आली . ही अतिशय गंभीर बाब असून याची चौकशी करू असे आदेश अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.