पुलवामा हल्ल्यातील शहिद जवानांसाठी साजगाव ग्रामस्थांकडून निधी संकलन

0

प्रांत अधिकारी यांना पाच हजारांचा धनादेश सुपूर्द

पाचोरा :- पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या परिवारांना मदत व्हावी या उद्देशाने साजगाव ता. पाचोरा येथील ग्रामस्थ आणि तरुणांनी मी स्वयंस्फूर्तीने निधी संकलन केले. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांच्याकडे ५ हजार रुपयांचा मदत निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रीय स्वयंम संघाचे तालुका संघचालक मनीष काबरा, अनुलोमचे भाग सेवक विकास लोहार तसेच संतोष पवार, प्रा.अनिल पाटील विनोद गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान मदत निधी संकलन तसेच साजगाव ग्रामपंचायत प्रांगणात शहिद जवानांच्या स्मरणार्थ वटवृक्ष देखील लावण्यात आले. विनोद पाटील, अमोल दाभाडे, पियुष जैन, संजय गोसावी, धर्मराज शिंदे, गौरव शिंदे, सागर गायकवाड, रामेश्वर पवार, रोहित पवार, वाल्मिक पवार, आबा पाटिल,बापु गांगरे, आणि विजय महाराज आदींनी यात सहभाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.