पिंपळगाव (हरे) येथील हरेश्वराचे घेतले ७० हजार भाविकांनी दर्शन

0

पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा :- येथील हरेश्वर शिव मंदिराची महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या यात्रेत तालुका व परिसरातील सुमारे ७० हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता. पहाटे ४ वाजता येथील सरपंच सुनिता भगवान पाटील यांच्या हस्ते तर दुपारी १२ वाजता विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर यांचे हस्ते महाआरती करण्यात आली. भाविकांनी पहिटे पासुनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. महिलांनी बेलफुल वाहुन तर पुरुष व युवकांनी नारळ व प्रसाद चढवुन दर्शन घेतले.

महाशिवरात्री निमित्त रविवारी ह.भ.प. मंगलाबाई चिखलीकर, दि. ४ रोजी सोमवारी ह.भ.प. भागवत महाराज (शेंदुर्णी) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम झाला. तर दि. ५ रोजी मंगळवारी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ह.भ.प. महादेव महाराज माळी (पिंपळगाव हरे.) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तालुक्यातील पिंपळगाव हरे. येथील बहुळा नदी तिरावर असलेल्या ५०० वर्षांपुर्वीच्या हरि हरेश्र्वर शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्त १५ दिवस यात्रा भरते. मंदिराचे पुजारी म्हणुन गोंविद गुरव हे काम पहातात. दरम्यान रोज सकाळी ५ ते ६ वाजता काकळा आरती, सकाळी ६ ते ७ वाजता हरिपाठ व रात्री ८:३० ते ११:३० वाजेच्या दरम्यान तीन दिवस किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. हरि हरेश्वर मंदिर संस्थांनचे अध्यक्ष शालिग्राम मालकर, उपाध्यक्ष ईश्वर पाटील, सचिव पंडित तेली, खजिनदार राजेंद्र गायकवाड, सदस्य संजय तेली, दिलीप देशमुख, संदिप देव, सुधीर बडगुजर, सुनिल पवार, दत्तु कुंभार, कडुबा गोसावी, पांडुरंग चोरमले, प्रविण गुजर, उत्तम लोहार, शांताराम ठाकुर, देविदास पाटील, गोविंदा पाटील, शामराव महाजन, संतोष गोरे, भगवान शिंपी हे यात्रे दरम्यान सहकार्य करतात. हरि हरेश्वर मंदिराच्या विकासासाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतुन निधी मिळावा अपेक्षा अध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी बोलुन दाखविली. यात्रेत संसार उपयोगी भांडी, लहान मुलांची खेळणी व मिठाईच्या दुकानातुन लाखो रुपयांची उलाढाल होते.

Leave A Reply

Your email address will not be published.