राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार लासूरे प्राथमिकला प्रदान 

0
विधानसभा अध्यक्ष बागडेंच्या हस्ते औरंगाबाद येथे सत्कार, जिल्हयातील एकमेव शाळा 
जळगांव | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीमार्फत दिला जाणारा जळगाव जिल्हा राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पाचोरा तालुक्यातील लासुरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नुकताच औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते लासूरे शाळेचे आदर्श शिक्षिका उज्वला परदेशी-वरखेडी शाळा, अरुणा उदावंत-राजुरी, योगेश तागड, रणजीत परदेशी यांना आदर्श शिक्षक स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देउन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा देवरे, माजी सरपंच सुदाम देवरे, ग्रामपंचायत सदस्य अ‍ॅड.दिनकर देवरे, मनोहर देवरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील देवरे, रवींद्र पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
 राज्यस्तरावर पुरस्कारासाठी निवड झालेली ही जळगाव जिल्ह्यातील एकमेव शाळा असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधन सुविधेसोबत भौतिक सुविधा उपलब्ध असाव्यात यासाठी मुख्याध्यापक योगेश तागड, रणजीत परदेशी, प्रवीण पाटील, माजी मुख्याध्यापिका उज्वला परदेशी व अरुणा उदावंत या शिक्षकांनी प्रयत्न केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.