पुण्यात आणखी तिघांचा करोनाने मृत्यू

0

पुणे: पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येसह मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील ससून रुग्णालयात आज आणखी तिघांचा करोनाने मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील मृतांची संख्या आता ८ वर पोहोचली. तिघांचे वय हे साठ वर्षांपेक्षा अधिक होते. त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. या तिघांचा आज, मंगळवारी सकाळी ९ ते ११ दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळते.

दरम्यान, शहरातील काही भागांमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आढळून आली आहे, अशा भागांना पूर्णपणे सील करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं सोमवारी घेतला. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून पुणे शहरातील काही भाग आठवड्याभरासाठी सील करण्यात आले. यामध्ये शहरातील मध्य वस्तीतील पेठांचा भाग, कोंढवा, महर्षीनगर ते आरटीओपर्यंतचा भाग यांचा समावेश आहे. याच सर्व भागांमध्ये दाट लोकवस्ती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.