बोदवड तालुक्यातील ग्रामसेवक राबवताय कोरोना पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना

0

बोदवड (प्रतिनिधी) :- देशासहीत राज्यात वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता लागू करण्यात आलेल्या संचार बंदीचे काटेकोर पालन ग्रामीण भागात ग्रामसेवकांमार्फत ग्रामसमितीशी समन्वय साधून करण्यात येत आहे.

तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात पंचायत समिती गटविकास अधिकारी आर.ओं.वाघ,विस्तार अधिकारी आर.बी.सपकाळे यांच्या मार्गदर्शनाने सर्व ग्रामसेवक कोरोना (कोविड-१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत विविध प्रकारच्या उपाययोजना करून गावात जनजागृती करीत आहेत.

त्यात वेळोवेळी हात साबणाने धुवा,तोंडाला रुमाल अथवा मास्क लावा,विनाकारण घराबाहेर निघू नका,संचारबंदीचे पालन करा असे आवाहान गावागावात करण्यात येत असून गावातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी,मलनिसारण बाबत प्रबोधन करण्यात येत आहे. तसेचं काही गावांमध्ये ग्रामसेवक स्वत:धूरळणी यंत्र हातात घेऊन फवारणी करीत आहेत तर बहुतेक ग्रामसेवक गावात दिवसभर राहून रिक्षा गाडीतून संचारबंदी व कोरोना बाबत ग्रामस्तरावरिल स्थापन केलेल्या समितीशी समन्वय ठेवून ग्रामस्थानांमध्ये जनजागृती करीत आहेत.

तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन करीत असून प्रशासनाच्या सुचना व आदेशाचे तंतोतंत पालन करीत आहेत अशी माहिती बोदवड येथील ग्रामसेवक संदीप चंद्रभान निकम यांनी याबाबत बोलतांना सांगितली तर कोरोनाचा नायनाट करण्यासाठी संपुर्ण जिल्ह्यातील ग्रामसेवक ग्रामपातळीवर विविध उपाय योजना करीत असून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ते थेट ग्रामीण भागात संपर्क साधून नियोजन करीत असल्याने ग्रामसेवकांचाही विमा काढण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन ( डि.एन.ई.१३६)चे राज्य कोषाध्यक्ष संजीव अभिमन्यू निकम त्यांनी शासनाकडे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.