लॉकडाऊनमध्ये सुद्धा लॉयन्स क्लबचे अन्नछत्र निरंतर चालू

0

खामगाव (प्रतिनिधी) : शहरातील प्रसिद्ध समाजसेवी संस्था लॉयन्स क्लब खामगाव द्वारे लॉयन्स अन्नछत्र चे गेल्या तीन वर्षापासून कार्य चालू आहे. स्थानिक सामान्य रुग्णालयामध्ये गरजू पेशंटच्या नातेवाईकांना दररोज अडीचशे ते तीनशे लोकांना भरपेट जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी पोळी, भाजी,भात, जिलेबी व पेशंटसाठी बिस्कीटचा पुडा अशा पद्धतीने केली जाते. या अन्नक्षेत्रा ची प्रेरणा शहरातील प्रसिद्ध व्यवसायिक तसेच समाजसेवी श्री सुरेश चंद्र जी अग्रवाल यांच्याकडून घेऊन लायन्स क्लब खामगावने गेल्या तीन वर्षापासून निरंतर अन्नछत्रा चे वाटप सकाळी दहा वाजता न चुकता आतापर्यंत पार पाडले आहे.

संपूर्ण मानव जातीवर व या पृथ्वीतलावर करोना सारख्या महाभयंकर संसर्गजन्य रोगाने थैमान घातलेले असताना सामान्य रुग्णालय येथील परिस्थिती पाहता व तिथली वैद्यकीय व प्रशासकीय व्यवस्था याला कुठलाही अडथळा येऊ नये या कारणास्तव सध्या तेथील अन्नछत्र वाटप कार्यक्रम हा बंद ठेवण्यात आलेला आहे. आता नव्याने बंद डब्यामध्ये जवळपास 200 च्या वर भोजन पाकीट तयार करून तलाव रोड येथील आजूबाजूच्या परिसरामध्ये दुपारी एक वाजता दररोज वितरित करण्यात येत आहेत.

क्लबने हा सेवा प्रकल्प कायम चालू ठेवलेला आहे यामुळे अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत असलेल्या गरजू लोकांना उपलब्ध जेवणाची व्यवस्था होत आहे. यासाठी विशेष करून लायन्स क्लबचे प्रोजेक्ट चेअरमन लॉयन अभय अग्रवाल, लॉ उज्वल गोयंका, लॉयन सुशील मंत्री, लॉयन सुरज एम. अग्रवाल लॉयन डॉक्टर केशव मेंढे लॉयन संजय उमरकर लॉ.राजकुमार गोयंका तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष लॉ किशोर गरड सचिव लॉ.निखिल लाठे कोषाध्यक्ष लॉयन शंकर परदेशी तसेच लायन्स क्लब सर्व पदाधिकारी या उपक्रमासाठी परिश्रम घेत असल्याकारणाने समाजातील सर्व स्तरातून यांचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.