पुण्यातील धनकवडी भागात भिंत कोसळली

0

पुणे : येथील धनकवडी भागात सावरकर चौकातील एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळण्याची घटना आज पहाटे पावणेसहाच्या सुमासार घडली. भिंत पडणार अशी पूर्वकल्पना आल्याने आधीच येथील लोकांना सुरक्षित जागी हलविण्यात आल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मागील एक ते दीड महिन्यात भिंत कोसळण्याची ही शहरातील चौथी घटना आहे.

तळ मजल्यालगतच असलेली ही भिंत 30 वर्ष जुनी असल्याने ही भिंत कोसळण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे येथे राहणाऱ्या कुटुबियांना इतरत्र हलविण्यात आले होते. त्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. ही भिंत 16 फूट उंच आणि 50 फूट लांब होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.