पुढच्या महिन्यापासून बॅकिंगसह अन्य क्षेत्रात होणार ”हे” बदल ! जाणून घ्या

0

नवी दिल्ली : पुढचा महिना ग्राहकांसाठी मोठ्या बदलांचा एक टप्पा घेऊन येणार आहे. 1 ऑक्‍टोबर 2019 पासून रस्त्यांपासून ते स्वयंपाकघरापर्यंत बदल होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर बॅंकिंग सेवांमध्ये बरेच बदल लागू केले जाणार आहेत. यातील बहुतेक बदल ग्राहकांना चांगल्या आणि स्वस्त सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने असणार आहेत.

रिझर्व्ह बॅंकेच्या आवाहनानंतर एसबीआयसह अनेक बॅंका आपल्या कर्जाचे व्याज दर रेपो दरांशी जोडत आहेत. यानंतर 1 ऑक्‍टोबरपासून घर व वाहनांचे कर्जही स्वस्त होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एसबीआयने आपल्या किमान शिल्लक नियमातही अनेकांना दिलासा दिला आहे. दरम्यान, यासोबतच वाहन परवानाही पुढील महिन्यापासून बदलण्यात येणार आहे. तसेच संरक्षण खात्याशी संबंधित केंद्रीय कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचे नियमही सरकारने बदलले आहेत. जीएसटी कौन्सिलनेही 1 ऑक्‍टोबरपासून मोठ्या करदात्यांसाठी रिटर्न फॉर्म अनिवार्य केला आहे. याशिवाय, एलपीजीच्या किमतींमध्येही बदल केले आहेत जे बदल सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.